महाविकास आघाडीत गडबड?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या गडात जाऊन आपली ‘पॉवर’ दाखवली. तर राऊतांच्या या इशाऱ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय शिरुर दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार बॅटिंग केली. राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या गडात जाऊन आपली ‘पॉवर’ दाखवली. शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड… आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली.
पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखलं. तसंच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे. अपेक्षेप्रमाणे राऊतांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे दिले आहेत. तर राऊतांच्या या इशाऱ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.