NewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमभारतमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

स्त्री सुरक्षते बाबत अजूनही चिंता.पुण्यात येरवडा येथील गाडीतळ परीसरात राहणार्‍या ४५ वर्षीय व्यक्तिने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली आहे. तू माझ्याशी लग्न न केल्यास तुला घरात घुसून मारेल, तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकेल, अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मोहम्मद हुसेन खान (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा गाडीतळ परिसरात ४५ वर्षीय आरोपी मोहम्मद हुसेन खान हा वास्तव्यास आहे. त्याच्या घराजवळ राहणार्‍या १६ वर्षीय मुलीस जून २०२१ ते २७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तिला मानसिक त्रास दिल्याची घटना घडली आहे.

या तीन महिन्याचा कालावधीत आरोपी तिला येता–जाता प्रपोझ करायचा. तुझे वय १८ वर्ष होईपर्यंत मी वाट पाहीन. तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावायाचा. दरम्यान त्याने थेट चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.या प्रकरणी १६ वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ओरोपी विराधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे येरवडा पोलिसांनी सांगितले.