कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत,आज तब्बल एवढे पॉसिटीव्ह
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा तिसऱ्या लाटेची सुरुवात दर्शवत आहे. गेल्या 24 तासांत 42,667 नवीन कोरोना रुग्णांची वाढ होऊन ३६,४२२ रुग्ण बरे झाले तर 342 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे, सक्रिय प्रकरणांच्या संख्येत 5,898 ची वाढ नोंदवण्यात आलीये. सध्या देशात 3.99 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या 10 दिवसांपैकी 9 दिवसात 40 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 24 ऑगस्टपासून आतापर्यंत, म्हणजेच 12 दिवसात, 11 वेळा असे घडले जेव्हा सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ नोंदवण्यात आली.
केवळ 30 ऑगस्ट रोजी, सक्रिय प्रकरणांमध्ये 6,200 ची घट झाली होती. पॉझिटिव्हीटी रेट ही वाढत आहे. 23 ऑगस्ट रोजी ते 1.3% होते, नंतर 2 सप्टेंबर रोजी ते 2.7% झाले.
केरळमध्ये शुक्रवारी 29,322 लोकांची वाढ झाली होती. तर 22,938 लोकं बरे झाले होते. तर 131 जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत 41.51 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 38.83 लाख लोकं बरे झालेत. 21,280 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2.40 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात शुक्रवारी 4,313 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर 4,360 लोकांनी कोरोनावर मात केली होती. तर 92 लोकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत 64.77 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून 62.86 लाख लोकं बरे झाले आहेत. आतापर्यंत 1.37 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 50,466 जणांवर उपचार सुरु आहेत.