जिल्हाधिकारीचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या देशी दारूच्या दुकानावर एल. सी. बी. पथकाची कारवाई
नेकनुर – कोरोना संकटात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नेकनुर येथील मांजरसुंबा – केज रोड वरिल हाॅटेल नंदनवन च्या शेजारी असलेल्या देशी दारूच्या दुकानात रात्री ९-३० वाजता दारू विक्री करणाऱ्या तीन अरोपीना अटक करून देशी दारूचे आठ बाॅक्स किंमत २११५२ जप्त करून नेकनुर पोलीसात जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होईल असे कृत्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे.
देशी दारू अवैध विक्री दोन दिवसात दोन घटना
दारू विक्रीला परवानगी मिळाल्या पासून अवैध देशी दारू विक्रीच्या दोन दिवसात दोन घटना घडल्या आहेत. बाजार तळावर असलेल्या देशी दारूच्या दुकानातून स्कार्पिओ गाडी मध्ये देशी दारूच्या बाॅक्स घेऊन जात असताना पोलिसांनी पाठलाग केला परंतु अरोपी गाडी सह फरार झाला विशेष म्हणजे ही आणि अरोपी मांजरसुंबा येथील मोठ्या हाॅटेल व्यवसाईक व राजकीय पुढारीचा नातेवाईक होता म्हणून कारवाई केली नाही. स. पो. नि केंद्रे म्हणतात तो पडुन गेला का जावु दिला जर पडुन गेला असला तरी मांजरसुंबा दुर नव्हता या प्रकरणामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाला असावा म्हणून तर केंद्रे म्हणतात पडुन गेला आणि शुक्रवारी रात्री दुसर्या दुकानावर एल. सी. बी. च्या पथकाने कारवाई केली मग नेकनुर पोलीस कशासाठी आहे. स. पो. नि. केंद्रे काय करित आहे. या वर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी विचार करून नेकनुर ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी पाठवा अशी मागणी जनतेतून होत आहे.