महाराष्ट्र

त्यादिवशी त्याची सर्व बोटे छाटली जातील; राज ठाकरे आक्रमक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Sept :- कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट कापले गेले आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर आता मनसे अधिक आक्रमक झाली आहे.

यावर राज ठाकरेंनी आपली आक्रमक भूमिका मांडलीय. ज्या दिवशी तो जेलमधून सुटेल त्या दिवशी आमच्याकडून त्याची मस्ती उतरवत त्याची सर्व बोटे छाटली जातील. पुन्हा त्याला फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही. तेव्हा त्यांना कळेल. या फेरीवाल्यांची हिंमत कशी होते?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका देखील राज ठाकरे यांनी मांडली आहे.