महाराष्ट्रात पुन्हा lockdown लागणार?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विषाणूचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली आहे.राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाहीये. अनेक भागांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं दिसत आहे आणि त्यातच कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिन्यात गौरी-गणपती आहेत आणि सणासुदीच्या काळात कोविड रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याने पुन्हा कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊनलागू करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सध्या लॉकडाऊनचा कुठलाच विषय नाहीये. मात्र ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल त्यादिवशी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, असं नोटिफिकेशनमध्ये आम्ही अगोदरच स्पष्ट केलं आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या या माहितीमुळे हे स्पष्ट झालं आहे की, सणासुदीच्या या काळात राज्यात तुर्तासतरी कोणतेही कठोर निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्यात येणार नाहीये.