NewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमराजकारण

अनिल देशमुख यांचा जावई सीबीआयच्या ताब्यात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे, सुत्रांनी ही माहिती दिली. पण देशमुख यांच्या कुटुंबियांनी डॉ. चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप केला आहे. कुठलीही माहिती न देता या दोघांना ताब्यात घेतल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.देशमुख यांच्या सून राहत देशमुख यांनी आरोप केला की, “त्यांच्या वरळी येथील घराखाली ८ ते १० लोक एका पांढऱ्या इनोव्हा कारमधून आले. साध्या कपड्यांमध्ये असलेल्या या लोकांनी डॉ. गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलांन जवळील फोन जप्त करुन त्यांना कारमधून घेऊन गेले. सध्या आम्ही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी वरळी पोलीस ठाण्यात आलो आहोत. आज (बुधवार) संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली” सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण अद्याप त्यांनी अधिकृतरित्या हे जाहीर केलेलं नाही. या ठिकाणी त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे.