LPG गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ !
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
०१ सप्टेंबर | तसे तुम्हाला माहिती असेलच प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करत असतात. महागाईचा भडका सातत्याने वाढताना दिसून येत असून आज सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रचंड वाढ केली असून विना अनुदानित १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरची किंमत २५ रुपयाने वाढल्याने आता बीडमध्ये हे सिलेंडर तब्बल ९११ रुपयांना मिळणार आहे तर १९ किलो व्यवसायिक गॅसचे सिलेंडर तब्बल ७५ रुपयांनी वाढवले आहे. पंधरा दिवसात सिलेंडरच्या किमती तब्बल ५० रुपयांनी वाढल्या आहेत.
14.2 किलोग्रॅम-884.5 रुपये,19 किलोग्रॅम-1591.39 रुपये,पेट्रोल-107.52 रुपये प्रति लिटर आणि डिझेल-96.48 रुपये प्रति लिटर असे दार तेल कंपनी कडून जाहीर करण्यात आले आहेत.