पोटच्या लेकरानं चिरला आईचा गळा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
०१ सप्टें | जन्मदात्या आई वर धारदार चाकूने वार करत घाबरलेल्या मुलाने शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथे आज दुपारी घडली जखमी आईची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या बाबत अधिक असे की. माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील कदम कुटूंबातील पारुबाई कदम व तिचा 30 वर्षीय मुलगा बापू कदम या मायलेकरात घरगुती कारणावरून वाद सुरु झाला संतापलेल्या बापूने आईच्या गळ्यावर धारदार विळ्याने वार केला पारुबाई गंभीर जखमी झाल्याने भेदरलेल्या बापूने शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. यातील पारुबाई गंभीर जखमी आहेत त्याच्यावर बीड येथे उपचार सुरु आहे