सिनेमा,मनोरंजन

77 वर्षीय अभिनेत्री सायरा बानो रुग्णालयात दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Sept :- दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांना प्रकृती अस्वास्थामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सायरा बानो यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरा बानो यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं काहीही कारण नाही.” दरम्यान, सायरा बानो या 77 वर्षांच्या आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या त्या पत्नी. याच वर्षी जुलैमध्ये दिलीप कुमार यांचं निधन झालं होतं. दिलीप कुमार यांच्या निधनानं सायरा बानो पुरत्या खचल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो म्हणाल्या होत्या की, “देवानं माझ्या जगण्याचं कारण काढून घेतलंय, माझं अस्तित्व माझ्याकडून हिसकावलंय, दिलीप साहेबांशिवाय मी काहीच विचार करू शकत नाही, कृपया सर्वांनी प्रार्थना करा.”