बीड

नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी शैलेश नाईकवाडेंच्या नावाची चर्चा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड, ३१ ऑगस्ट (प्रतिनिधी) :- डिसेंबर महिन्याअखेर नगर पालिकेच्या निवडणुका लागणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आणि त्यानंतर राजकीय पुढारी, कार्यकर्ते निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागलेली दिसून येत आहे. समाजकार्यामध्ये नेहमी पुढाकार घेत सामन्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जे पुढे आले त्यांच्या नावाची चर्चा नागरिकांमधून ऐकला मिळू लागली आहे. तर अनेकांमध्ये युवांना संधी देण्यासाठीची चर्चा सुद्धा सुरु असल्याचे समोर येत आहे. आई-वडिलांचा लाभलेला राजकीय वारसा आणि बीड जिल्ह्याचे माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्ष भारतभूषन क्षीरसागर तथा युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या मार्गर्शन, छत्र-छायेखाली गरजवंतांसाठी आहोरात्र धरपडणारे युवा नेते शैलेश नाईकवाडे यांचं नाव नागरिकांमध्ये नगरसेवकाच्या उमेवारीसाठी कौतुकानं घेण्यात येऊ लागलं आहे.


कोरोना काळात गरजवंतांना शैलेश नाईकवाडे यांनी आहोरात्र सेवा देण्याचे काम केले आहे. याबरोबरच कोरोनाच्या महाभयंकर महामारीमध्ये अनेकांवर उपासमारीची देखील वेळ आली होती. या वाईट काळात शैलेश यांच्याकडून बीडकरांना माणुसकीचे विराट दर्शन घडले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी हजारों घरात स्वतः जाऊन किराणा सामानाच्या किट पोहोचवल्या, आजारी माणसांना औषधोपचार मिळवून दिले तर अनेकांना वेळोवेळी मानसिक आणि आर्थिक साहाय्य देखील केले.

कोरोना रुग्णांना स्वखर्चाने वेळेवर रुग्नालयात पोहचवणे, बेड मिळवून देणे, रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था करणे आणि ज्या घरात कोरोना रुग्ण आढळला आहे अशा घरांत जाऊन संपूर्ण घर सॅनिटाईज करणे अशे अनेक कार्य करून शैलेश यांनी समाजात लोकांबरोबर माणुसकीचे आणि आपुलकीचे नाते निर्माण केले. यामुळे साहजिकच यंदा नागरिकांमध्ये नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी शैलेश नाईकवाडे यांच्या नावाचा सूर उमठू लागला आहे.