बीड

बीडमधील १२ रुग्ण उद्या होणार कोरोनामुक्त

देशात आणि राज्यात झपाट्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामधून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. निश्चितच ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाला आनंद पोहचवणारी आहे.बीड शहरातील ७५ वर्षीय वृद्धा सहित इतरत १२ रुग्णांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे हि बातमी बीडवासीयांना आनंद देणारी आहे.बीडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी बीडमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढू लागली आहे.
७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला दम्याचा त्रास होता पण बीड मधील डॉक्टरांच्या परिश्रमामुळे व नर्स,कर्मचाऱ्यांच्या योग्य दक्षतेमुळे हा रुग्ण बारा झाला आहे.आत्तापर्यंत बीड मध्ये ४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता ७५ वर्षीय वृद्ध रुग्णासहित आणखी १२ रुग्णांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे.घाबरू नका,प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा,काळजी घ्या.