बीडNewsPopular NewsRecent NewsTrending Newsमराठवाडामहाराष्ट्र

बीडमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

बीड, 30 ऑगस्ट (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काल सर्वत्रच श्री कृष्ण जन्मअष्टमी कोरोना विषयक नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. प्रार्थना स्थळे, मंदिरे अद्याप शासनाने खुली केली नसली तरी जन्माष्टमीनिमित्त भाविकांची गर्दी मात्र बीड शहरातील श्री श्री राधा गोविंद मंदिरात दिसून आली. मंदिरात सर्वत्र स्वछता आणि सुशोभीकरण करून श्री राधाकृष्ण भगवंतास विशेष वस्त्र परिधान केले होते. धूप, दीप, आरती आणि “हरे रामा हरे कृष्णा” या जयघोषात संपूर्ण मंदिर भक्तिमय होऊन गेले होते. विशेषतः श्री कृष्ण दर्शनासाठी महिला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


त्याचबरोबर मंदिरातील भजनी मंडळ, गायनाचार्य, वादनाचार्य आणि मंदिरातील सर्व पुजारी यांचीही उपस्थिती दिसून येत होती. या वर्षीची जन्माष्टमी काहीशी खास होती. कारण यंदा जन्माष्टमीला एक विशेष योग जुळून आला. जसा द्वापर युगात भगवान श्री कृष्णाच्या जन्माच्या वेळी बनला होता. पंचागानुसार, यंदाच्या वर्षीही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनी भाद्रपद महिन्याची अष्टमी तिथी, कृष्ण पक्ष आणि रोहिणी नक्षत्र अशा एकत्र योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदाची जन्माष्टमी विशेष आहे. इस्कॉन तर्फे श्री श्री राधा गोविंद मंदिर बीड यांच्यावतीने श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दाऊजी के भैय्या कृष्ण कन्हैया आणि हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे या मंत्राच्या जयघोषात सावतामाळी चौक येथील राधा गोविंद मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. श्री बलराम जयंतीपासून करुणा नियमांचे पालन करून श्रीमद भागवत यावर श्रीमान संत दास प्रभू यांनी श्रीकृष्णांच्या द्वारका लीलांचे वर्णन केले व श्रीमान शास्त्र स्वरूप प्रभू यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला चे वर्णन इस्कॉन युट्युब चॅनल वर केले. दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये श्री श्री राधाकृष्ण यांचे अभिषेक करण्यात आले ‘आजच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता राधा गोविंद यांची मंगल आरती श्रृंगार गार आरती प्रभुपाद यांचे गुरु पूजा सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून मंदिर मध्ये भजन कीर्तन व श्रीमान संत दास प्रभू यांचे प्रवचन झाले.

रात्री भगवंतांना छप्पन भोग अर्पण करून बरोबर 12 वाजता भगवंतांचा महाआरती झाली. या कार्यक्रमात मंदिराचे प्रमुख श्रीमान विठ्ठल आनंद दास यादवेंद्र दास कृष्ण नामदास ब्रह्मचारी भक्तगण व राधा गोविंद देव भक्त समाज यांचे विशेष सहकार्य लाभले.वरील सर्व कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता इस्कॉन बीड या यूट्यूब चैनल वर प्रसारित करण्यात आला. अशी माहिती इस्कॉन बीड चे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनाम दास यांनी दिल