आला कोरोना विषाणूचा नवीन प्रकार
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
३१ ऑगस्ट | कोरोनाच्या लाटांशी एकापाठोपाठ एक लढा देणाऱ्या जगासाठी आणखी एक चिंताजनक बातमी आहे. कोरोना महामारीसाठी जबाबदार व्हायरसचा SARS-CoV-2 एक नवीन प्रकार सापडला आहे. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आणि नंतर इतर अनेक देशांमध्ये सापडला आहे. अभ्यासानुसार, हा अधिक संक्रामक आहे आणि लसीचा याच्यावर प्रभाव पडत नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजे (NICD) आणि क्वाजुलु-नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्म (KRISP) च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, या वर्षी मे महिन्यात पहिल्यांदा C.1.2 व्हेरिएंट सापडला.
यानंतर, 13 ऑगस्ट पर्यंत हा व्हेरिएंट चीन, रिपब्लिक ऑफ दि कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्ये सापडला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा विषाणू व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट कॅटेगिरीचा असू शकतो. डब्ल्यूएचओच्या मते, व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट कोरोनाचे असे व्हेरिएंट आहे, जे व्हायरसच्या ट्रान्समिशन, गंभीर लक्षणे, इम्यूनिटीला चकमा देणे, डायग्नोसिसपासून बचाव करण्याची क्षमता दाखवतात. एका संशोधानात म्हटले आहे की, C.1.2 यापूर्वी मिळालेल्या C.1 च्या तुलनेत खूप जास्त म्यूटेट झाला आहे.
C.1 ला दक्षिण अफ्रिकेत कोरोनाच्या पहिल्या लाटेसाठी जबाबदार मानले जाते. संशोधकांनी नमूद केले आहे की, हे म्यूटेशन व्हायरसच्या दुसऱ्या भागांच्या बदलासोबत मिळून व्हायरसला अँटीबॉडी आणि इम्यून सिस्टमपासून बचाव करण्यात मदत करतात. यामध्ये त्या लोकांचाही समावेश आहे ज्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच अल्फा किंवा बीटा व्हेरिएंटसाठी अँटीबॉडी डेव्हलप झाल्या आहेत.