मारायला गेली सवतीला,अन जीव गेला तिसरीचाच. हत्येसाठी तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
३१ ऑगस्ट | खळबळ जनक प्रकार – पहिल्या पत्नीने पतीच्या दुसऱ्या पत्नीच्या हत्येचा रचला कट, पण मास्कमुळे तिसऱ्याच महिलेला जीव गमवावा लागला. बिहारच्या सीतामढीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीतामढीमध्ये राहणारे डॉक्टर शिवशंकर महतो यांचा पहिली पत्नी सीमा हिच्याशी वारंवार वाद होत होता. याच कारणामुळे डॉक्टर शिवशंकर महतो सीमासोबत रहात नव्हते. याचदरम्यान शिवशंकर महतो यांचं क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या शबनम या नर्ससोबत प्रेमप्रकरण सुरु झालं. आणि यानंतर त्यांनी लग्नही केलं.
ही गोष्ट पहिली पत्नी सीमाला कळल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद पोलीस स्थानकापर्यंत गेला होता.या घटनेमुळे संतापलेल्या सीमाने शबनमच्या हत्येचा कट रचला. सीमाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने शबमनच्या हत्येसाठी तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी दिली. मारेकऱ्यांना शबनमचा फोटोही दिला. हत्येच्या दिवशी डॉक्टर शिवशंकर महतो यांच्या क्लिनिकमध्ये शबनम आणि बबली या दोन नर्स कार्यरत होत्या. यावेळी हल्लेखोरांनी क्लिनिकमध्ये घुसत अंदाधुंद गोळीबार केला. पण दोघीनी मास्क लावल्याने हल्लेखोरांना शबनमला ओळखता आलं नाही, त्यामुळे त्यांनी दुसरी नर्स असलेल्या बबलीवर गोळ्या झाडल्या आणि यातच तिचा मृत्यू झाला.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.