सप्टेंबरमध्ये या 12 दिवशी बँका राहणार बंद
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
३० ऑगस्ट | ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बँकेची कामं कोणत्याही घाईगडबडीशिवाय अगदी सहज करु शकता. कारण सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत बँकांना कमी दिवस सुट्ट्या असणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) हॉलिडे कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये तब्बल 12 दिवसांसाठी बँकांना सुट्टी असणार आहे. RBI च्या अधिकृत यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात सात दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यासोबतच चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार मिळून सप्टेंबरमध्ये एकूण 12 दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. RBI नं ‘Holiday under Negotiable Instruments Act’ कॅटेगरी अंतर्गत सप्टेंबर महिन्यातील बँक हॉलिडे ठरवले आहेत.
या सात दिवसांत वेगवेगळ्या राज्यांतील सण-उत्सव, धार्मिक समारंभांचा विचार करुन सुट्ट्यांचा समावेश केला आहे. त्यासोबतच ही माहितीही देण्यात आली आहे की, आठवडा सुट्ट्या वगळून RBI च्या सुट्ट्यांची यादी ही सर्वच बँकांसाठी लागू नसते. म्हणजेच, जर एखाद्या बँकेला सुट्टी असेल, तर आवश्यक नाही की, दुसऱ्या बँकेलाही ती सुट्टी असेल. दरम्यान, देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांतील सणावारांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. 5 सप्टेंबरला रविवार असल्यामुळे सप्टेंबर महिन्यातील बँकांची ही पहिली सुट्टी असले.
तर 10 सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी असेल. आरबीआयच्या अधिकृत आठवड्यातील सुट्ट्या वगळता 8 सप्टेंबरला श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील. तर या महिन्याची शेवटची बँक सुट्टी ही 21 सप्टेंबरला असेल. श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची आणि तिरुअनंतपुरम येथील बँका या दिवशी बंद राहतील. तर 25 सप्टेंबरला चौथा शनिवार आणि 26 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
5 सप्टेंबर : रविवार
8 सप्टेंबर : श्रीमंत शंकरदेव तिथी (गुवाहाटी)
9 सप्टेंबर : तीज (हरितालिका) – (गंगटोक)
10 सप्टेंबर : गणेश चतुर्थी / संवत्सरी (चतुर्थी प्रकाशयोजना) / विनायक चतुर्थी / वर्षासिद्धी विनायक व्रत – (अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी)
11 सप्टेंबर : दुसरा शनिवार / गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) – (पणजी)
12 सप्टेंबर : रविवार
17 सप्टेंबर : कर्म पूजा – (रांची)
19 सप्टेंबर : रविवार
20 सप्टेंबर : इंद्रजत्रा – (गंगटोक)
21 सप्टेंबर : श्री नारायण गुरु समाधी दिवस – (कोची आणि तिरुअनंतपुरम)
25 सप्टेंबर : चौथा शनिवार
26 सप्टेंबर : रविवार
महाराष्ट्रात 5, 10, 11, 12, 19, 25 आणि 26 सप्टेंबर या दिवशी बँका बंद रहाणार आहेत. या शिवाय चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार या दिवसांची सुट्टी कायम असेल.