बीड शहरामधील कर्फ्यू रद्द
बीड: जिल्हाधिकारी बीड यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये रात्री 2वाजता संपूर्ण बीड शहरात लागू केलेली संचारबंदी हटवली. तसे आदेश त्यांनी जारी केले आहेत. त्यामुळे सकाळी 7:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारेगाव ता. पाटोदा येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले प्रत्यक्ष नागरिकांचे स्वब आज निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे शहराने सुटकेचा निःश्वास सोडला. शहरातील याच भागात संचारबंदी
१. मोमीनपुरा-अशोकनगर, जयभवानीनगर,सावतामाळी चौक, संभाजीनगर बालवीर येथील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवणे ठेवण्यात येत आहे.
२. या कार्यालयाचे दिनांक २८/०५/२०२० रोजीचे किराणा सेवा घरपोच पुरविणे, बँका बाबत व अत्यावश्यक सेवेबाबत काढलेले ( फिरते दुध विक्रेते, जार वाटर सप्लायर्स इ. बाबतचे) तीनही आदेश रदद करण्यात येत आहेत.
३. यापूर्वी या कार्यालयाने दिनांक २५/०५/२०२० रोजी काढलेले आदेश पूर्ववत करण्यात येत आहेत. ज्याद्वारे जिल्हयातील सर्व भागांना (Conatinament व परवानगी देण्यात आलेली होती.
Buffer Zone वगळून) सकाळी ७.३० ते सध्यांकाळी ६.३० पर्यंत