NewsPopular NewsRecent NewsTrending Newsक्राईमदेश विदेश

काबुल विमानतळाजवळ पुन्हा हल्ला 2 बालकांचा मृत्यू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२९ ऑगस्ट | 170 लोकांचा जीव घेणाऱ्या आत्मघाती हल्ल्यानंतर काबुल विमानतळाजवळ एका घरावर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा हल्ला रविवारी संध्याकाळी विमानतळाच्या पश्चिमेला खाज-ए-बुघरा या निवासी भागात झाला. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 3 लोक जखमी झाले आहेत. पीडितांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी स्फोटाला दुजोरा दिला आहे. अमेरिकन दूतावासाने काबूल विमानतळावरील धोक्याबाबत नवीन इशाराही जारी केला होता. यापूर्वी गुरुवारी संध्याकाळी विमानतळाजवळ दोन आत्मघातकी हल्ले झाले होते. अमेरिकेनंतर तालिबानने काबूल विमानतळावर हल्ल्याचा इशारा दिला होती.

अल जझीरा या वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, तालिबानने म्हटले होते की काबूल विमानतळावर ISIS च्या हल्ल्याची शक्यता खूप जास्त आहे. तसेच, लोकांना विमानतळावर जाऊ नका असे सांगण्यात आले होते. त्याचवेळी, तालिबानने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की पंजशीरचे सैनिक तालिबानच्या निष्ठेची शपथ घेत आहेत आणि लवकरच संपूर्ण पंजशीर तालिबानच्या कक्षेत घेतले जाईल.