धक्कादायक… रावसाहेब दानवे यांच्या छळाला कंटाळून हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी
औरंगाबाद( प्रतिनिधी)- कन्नड चे माजी आमदार कथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असून या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करू शकतो असा धक्कादायक खुलासा केला आहे.
हर्षवर्धन जाधव एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत की आपण पण आपल्या नावावर असलेली प्रॉपर्टी आपली पत्नी संजना च्या नावावर करू शकत नाही. आपल्या वडिलांच्या नावावर असलेली दहा कोटीची ही प्रॉपर्टी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे लुटू पाहत आहेत. दानवे यांनी आतापर्यंत जी गुंड गिरी केली तशीच ते यावेळी सही करतील अशी आपणाला भीती वाटत असून आपण सर्व काही बाजूला ठेवून कोचीन येथे जात असल्याचं जाधव यांनी सांगितलं. रावसाहेब दानवे यांनी आपल्यावर कोणताही दबाव अथवा गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केल्यास आपण सायनाइड च्या गोळ्या खाऊन आत्महत्या करू अशी धमकी हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. याच व्हिडिओत पुढे बोलताना ते म्हणतात दानवे पाटील आपल्या मुलीला भविष्यात राजकारणासाठी मी कोणतीही मदत करायला तयार आहे परंतु माझ्यावर दबाव आणू नका अन्यथा मी आत्महत्या करेल असे जाधव यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे.