atmosphereNewsPopular NewsRecent Newsभारतमराठवाडामहाराष्ट्र

सतर्क | राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ४ दिवसात मुसळधार पाऊस

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

ऑगस्ट २८ | राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार होण्या-या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाची शक्यते मुळे,महाराष्ट्र राज्यात येत्या 4,5 दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.