बालेकिल्ल्यातील अस्वस्थ कलावंतांना नाट्य परिषदेचा मदतीचा हात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
24 Aug :- बीड- दीड वर्षापासून लोककलावंतांच्या हाताला काम नाही हतबल झालेल्या आणि कर्जबाजारी झालेल्या या कलावंतांना आर्थिक अडचण जाणवू लागल्याने या लोककलावंतांना आर्थिक सहाय्य देण्याच्या मानवतेचा सोहळा काल दि. २४ रोजी बीडमध्ये पार पडला प्राचार्या दीपाताई क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय नाट्य परिषद आणि बालरंगभूमी जिल्हा शाखा बीडच्या माध्यमातून हा आर्थिक मदत वाटपाचा सोहळा नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता,आज 70 कलावंतांना प्रत्येकी 5 हजार असे साडेतीन लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराज पूजन करून स्वर्गीय काकू नाना यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, प्राचार्य दीपाताई क्षीरसागर, डॉ सतीश साळुंके, गौतम खटोड, ॲड श्रीराम लाखे, दिनकर शिंदे, विनोद मुळूक गणेश वाघमारे रवींद्र कदम ,विकास जोगदंड, भैय्यासाहेब मोरे, प्रभाकर पोपळे, विभाग प्रमुख संजय पाटील देवळानकर यांच्यासह ज्येष्ठ कलावंत व पत्रकार यांची उपस्थिती होती.
के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मदत स्वीकारण्यात आलेल्या काही कलावंतांनी आपल्या पारंपारिक कला सादर करत मान्यवरांचे स्वागत केले उपस्थित कलाकारांच्या वेगवेगळ्या गीत गायन व नृत्य सादरीकरण करण्यात आले, के एस के महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या कलावंतांनी कलेच्या द्वारेच उपस्थित कलाकारांना निमंत्रित केले होते यावेळी बहारदार सूत्रसंचालन डॉ उज्वला वणवे यांनी केले.
यावेळी प्रस्ताविकपर बोलताना डॉ दिपाताई क्षीरसागर म्हणल्या की, कोरोना महामारीत अनेक लोककलावंतांच्या कलेचे काम बंद झाले आहे उपजीविकेचे साधन म्हणून हा व्यवसाय स्वीकारला आणि तोच व्यवसाय दीड वर्षापासून बंद झाला हे सर्व कलाकार अडचणीत सापडले यामध्ये गोंधळी, आराधी, जागरण वाले, पोतराज, ढोलीबाजा, तुतारी, नाट्यकलावंत, संगीत कलावंत, मुरळ्या, वराती नाट्य, मसनजोगी, रायरन अशा अनेक कलावंतांचा समावेश आहे नाट्य परिषद बीड आणि बालरंगभूमी तसेच लोकसहभागातून या कलावंतांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प आम्ही केला होता नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे कला क्रीडा साहित्य या क्षेत्राला नेहमीच प्राधान्य देणारे नगराध्यक्ष हे कलावंतांसाठी देखील धावून आले आहेत या कलाकारांना ही तुटपुंजी मदत आम्ही करु शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे त्या म्हणाल्या,
अध्यक्षीय समारोप प्रसंगी नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर म्हणाले की, बीड शहर हे कलावंत निर्मितीचे ठिकाण आहे कलावंत हे बीड शहराचे वैभव असून बीडच्या मातीत अनेक कलावंतांची निर्मिती झाली आहे सांस्कृतिक चळवळ व वारसा अखंडितपणे चालू राहावा यासाठी जाणीवपूर्वक आपण कलाक्षेत्राला प्राधान्य देत आलो आहोत कला क्रीडा आणि सांस्कृतिक तसेच धार्मिक अशा अनेक क्षेत्रात बीड जिल्ह्याने नावलौकिक केला आहे कोरोना संपल्यानंतर भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोना काळात लोककलावंत प्रचंड अडचणीत सापडली हातावर पोट असणाऱ्या या लोकांना काहीतरी मदत करायची हे भावना होती बीडच्या नाट्यपरिषद बालरंगभूमी परिषदेच्या वतीने ही मदत देत आहेत ती नक्कीच आधार देणारी ठरणार आहे असे सांगून त्यांनी कलाकारांना आपण सदैव पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक,नाट्यशास्त्र विभागाचे सर्व कलाकार,पत्रकार,आणि मान्यवर उपस्थित होते.