बीड

बीड जिल्ह्यात कोरोना अंडर कंट्रोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Aug :-बीड जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. कोरोना चाचण्यांची आणि लसीकरणाची वाढती संख्या आणि रुग्णसंख्येचा घटता आकडा बीड जिल्हावासीयांना सुखावणारा आहे. आज दि 22 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4119 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 71 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4048 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 6
आष्टी 8
बीड 24
धारूर 2
गेवराई 2
केज 10
माजलगाव 2
परळी 1
पाटोदा 6
शिरूर 4
वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले आहेत.