महाराष्ट्र

अन्यथा लॉकडाऊन- मुख्यमंत्री ठाकरे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Aug :- राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी 700 मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात लॉकडाऊन लावावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईतील खास बाल कोविड काळजी केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, आज जनतेच्या सेवेसाठी दोन आरोग्यसेवेचे लोकार्पण झालं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे.

आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही, तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, त्याच अनुषंगाने लहान मुलांना कोविडची लागण झाली तर त्यांना रुग्णलयाचा भयावह वातावरण न वाटता चांगल्या वातावरण तयार करण्यासाठी हे सेंटर उभारले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, आता सुद्धा मी गर्दी बघितली, ही गर्दी योग्य नाहीये. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे. म्हणून काही निर्बंधामध्ये शिथिलता आणली आहे. मी सर्वांना विनंती करतो, कोणतेही राजकीय स्वार्थ अथवा आपल्या स्वतःचे स्वार्थ यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा वर्तन करू नका, असं ते म्हणाले.

सर्व राजकीय पक्षांना , धार्मिक ,सामाजिक संघटनाना मी विनंती करतो आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असं काही करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. कोरोना संकट अजूनही टळले नही, आपल्याला हे टाळायचा आहे.. आपण जर नियम पाळले नाहींतर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल, असंही ते म्हणाले. लॉकडाऊन टाळायचा असेल तर कोणीही कितीही चिथावल असेल, भडकवलं तरी त्यांच्या चिथावणीला दाद देउ नका, असंही ते म्हणाले.