बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाची गती मंदावली, पण…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Aug :- बीड जिल्ह्यात आज दि 16 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4831 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 92 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4739 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची गती मंदावली असली तरी आष्टी तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे. तर रुग्णसंख्येचा आकडा जिल्ह्यात कमी होत चाललल्याने नागरिकांकडून कोरोना विषयक नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.


आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात
अंबाजोगाई 1
आष्टी 38
बीड 11
धारूर 5
गेवराई 5
केज 8
माजलगाव 4
पाटोदा 13
शिरूर 4
वडवणी 3 असे रुग्ण आढळून आले आहेत.