बीड कोरोना रिपोर्ट; रुग्णसंख्येचा अकडा पुन्हा वाढला
19 Aug :- बीड जिल्ह्यात आज दि 19 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5852 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 143 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5709 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 7 आष्टी 66 बीड 12 धारूर 3 गेवराई 8 केज 8 माजलगाव 5 पाटोदा 20 शिरूर 2 वडवणी 12 असे रुग्ण आढळून आले आहेत.