बीड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Aug :- बीड तालुक्यातील नेकनूर जवळ असलेल्या साखरे बोरगाव येथे एका नराधमांने एका ११ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बीड येथील विक्रम पवार वय २४ याच्या विरुद्ध नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील पिडीत अल्पवयीन मुलगी शेतात अस्ताना यातील अरोपी विक्रम पवार याने तिच्यावर बलात्कार केल्याची फिर्याद पिडीतेच्या आईने दिली आहे. या प्रकरणात अरोपी विरुद्ध पोक्सो सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करित आहे.