विकेंड लॉकडाऊनमधून बीडकरांना ‘स्वातंत्र्य’
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
14 Aug :- गेल्या अनेक दिवसांपासून विकेंड लॉकडाऊनचा सामना करत असलेल्या बीड जिल्हावासीयांना स्वातंत्र्य दिनादिवशी विकेंड लॉकडाऊनमधून स्वातंत्र्य मिळाले आहे. बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत खुले करण्यास जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी परवानगी दिली आहे, त्याबाबत चे आदेश रात्री त्यांनी काढले आहेत . त्याचबरोबर रेस्टॉरंट, हॉटेल,मॉल याबाबत देखील नव्याने आदेश काढण्यात आले आहेत.
राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्याने शासनाने याबाबत निर्णय न घेता निर्बंध कायम ठेवले होते, मात्र शनिवारी रात्री बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी नव्याने आदेश काढले आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्व दुकाने हे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येतील .मात्र त्यासाठी दुकान मालक आणि दुकानात काम करणारे कामगार यांच्या लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या असाव्यात, तसेच दुकानात निर्जंतुकीकरण केलेलं असावे असे म्हटले आहे. हॉटेल,बार ,रेस्टॉरंट पन्नास टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात यावेत, तसेच लग्न कार्यासाठी जास्तीत जास्त 200 लोकांची उपस्थिती मान्य असेल.