विधवेची गळफास घेऊन आत्महत्या
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
12 Aug :- ओळखीच्या पुरुषाकडून मोबाईलवर व घरी येऊन दिलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विधवा महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली असून आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून सध्या आरोपी फरार आहे. सदरील महिलेच माहेर केज तालुक्यातील शिरपुरा होत.
वडवणी येथील बाळू केंगार हा ओळखीचा फायदा घेत सदरील विधवा महिलेस फोनवर व प्रत्यक्ष घरी येऊन लगट साधण्याचा प्रयत्न करायचा. याबाबत सदर महिलेने आणि तिच्या वडीलाने त्याला अनेकदा समजावून सांगितले मात्र बाळू केंगार आपले उद्योग सोडत नव्हता. यातूनच सदर महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पीएसआय ज्ञानेश्वर गव्हाणे करत आहेत.