क्राईम

बीड मध्ये विवाहितेचा खून

बीडमध्ये विवाहितेचा ल खून

बीड : शहरातील जालना रोडवरील हिना पेट्रोल पंपाच्या पाठीमागील परिसरामध्ये एका महिलेचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.29) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. उर्मिला रमेश मस्के (वय 37 रा.मंत्री गल्ली बीड) असे मयत महिलेचे नाव आहे घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत, सपना. गजानन जाधव यांच्यासह शहर पोलीसांनी धाव घेतली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पतीनेच ही हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती असून आरोपी पती स्वतः शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात