बीड

बीडच्या भूमिपुत्राची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Aug :- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील डोणगाव येथील ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या ज्योतिराम घुले यांची अखेर भारतीय दिव्यांग संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. सध्या भारताचा संघ हैद्राबादमध्ये सराव सामने खेळत असून १२ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध मालिकेला सुरुवात होणार आहे आणि या मालिकेसाठी ज्योतिराम घुले हे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांची कर्णधारपदी निवड झाल्याने बीड जिल्हावासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

रविवारी (दि.८) हैद्राबादमध्ये भारतीय संघाच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी कर्णधारपदाची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये एकदिवसीय मालिकेसाठी ज्योतिराम घुले यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली तर कसोटी मालिकेसाठी राकेश शर्मा (हरियाणा) आणि टी-२० साठी वसंत कुमार (तेलंगणा) यांच्याकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली. बीड जिल्ह्याच्या खेळाडूची पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होत कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत.