मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दोन डोस घेतलेल्यांना मिळणार मुभा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 Aug :- कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार राज्यावर कायम आहे. त्यामुळे कोरोना थोपवायचा असेल तर नियम पाळावेच लागणार आहे. मात्र, राज्याचं आर्थिक चक्रही चालणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात, शहरात कोरोना कमी झाला आहे, अशा ठिकाणी निर्बंध शिथिल करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सोबतच 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कामगिरी बजावली आहे. भारताने अनेक वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे नीरज चोप्रा यांचा अभिनंदन करायला हवं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक लोकांचा संसार उघडयावर आला असून यामध्ये 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दौरा केला होता. दरम्यान, पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले होते की, राज्य सरकार कोरोना निर्बंधात आणखी सूट देण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन लवकरच सुरु करण्याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वसामान्य माणूस लवकरच यामधून प्रवास करु शकेल असा संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. ते ‘बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट’ (बेस्ट) च्या एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले होते की, “महाराष्ट्र सरकार अधिक शिथिलता देण्यास तयार आहे. परंतु, आम्ही प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक घेत आहोत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांबाबतही निर्णय घेतला जाईल. या शिथिलतेमुळे कोरोना महामारीची इतर लाट येणार नाही हे आपल्याला सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते.”
राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून राज्यातील 25 जिल्ह्यांत कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यांत दुकाणे रात्री 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, राज्य सरकारने 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातील महत्वाच्या वर्गातील शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे.