वाढती रुग्णसंख्या बीड जिल्ह्यासाठी चिंताजनक
8 Aug:- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालला आहे. बीड जिल्ह्यात दरदिवशी सरासरी दोनशेहून अधिक जणांना कोरोनाची बाधा होत असून विशेष करून आष्टी आणि बीड शहरात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा कमी होत नाहिये. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5152 अहवालात बीड जिल्ह्यात आज 216 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
बाधितांमध्ये अंबाजोगाई 09, आष्टी 70, बीड 31, धारूर 03, गेवराई 18, केज 12, माजलगाव 31, परळी 03, पाटोदा 21, शिरूर 09 तर वडवणी येथे 09 रुग्ण आढळून आले आहेत.