बीड

हुतात्मा देवराव मा. व उच्च माध्यमिक विद्यालय भायाळा एच. एस .सी. परीक्षा निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम


बीड दि.3(प्रतिनिधी) नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ, भायाळा, ता. पाटोदा संचालित हुतात्मा देवराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने प्रतीवर्षा प्रमाणे याहीवर्षी आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकालासह सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे यामधे विशेष प्रविण्य 83 विदयार्थी व प्रथम श्रेणीमधे 18 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच कला शाखेचा 100 टक्के निकाल लागला यामधे परीक्षा देलेले 44 विदयार्थी पैकी विशेष प्राविण्य 26 तर प्रथम श्रेणी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माननीय श्री रामकृष्ण बांगर (सचिव नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ) व सत्यभामा ताई रामकृष्ण बांगर ( प्रगती शिक्षण प्रसारक मंडळ बीड) तसेच विजयसिंह रामकृष्ण बांगर (सरपंच भायाळा)उपसरपंच दादासाहेब बांगर ‌प्राचार्य दिनकर बांगर सर, प्रा.भोसले सर, प्रा आजबे मॅडम,प्रा वंजारे मॅडम, प्रा. कोल्हे सर, प्रा सचिन पवार, प्रा विलास पवार, प्रा.लाड, प्रा जामकर व विद्यालयातील सर्व कर्मचारीवृंद यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थी व पालकांचे सर्व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.