बीड

चित्रा वाघ यांच्या विरोधात शिरूरमधे अ दखल पात्र गुन्हा दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 Aug :- शिरूर कासार : कथीत बलात्कार प्रकरणी पोलीसांनी अटक न करता डी समरी करण्याची घाई केली असा आरोप करून बलत्कारी म्हणून माझी बदनामी केल्याप्रकरणी महेबुब शेख यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनला सोमवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टिच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा किशोर वाघ रा. मुंबई यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

या प्रकरणी चित्रा वाघ या शिरूर येथे दि .१८ – ७ -२०२१ रोजी आल्या असता शिवाजी एकनाथ पवार जिल्हा परिषद सदस्य व बीड जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या सह भाजपाच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत माझेविषयी बदनामी व्हावी. या उद्देशाने शिरूर येथील राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी एका मुलीवर बलात्कार केला. त्याप्रकरणी पोलीसांनी अटक न करता बलात्कार प्रकरणी डी समरी दाखल करण्याची घाई केली. असे शब्द ऊच्चारून माझी बदनामी केली, सदसरील संभाषण व्हि डी ओ .क्लिप माझ्या मित्रांकडून पहाण्यास मिळाल्यावरून मला मनस्ताप झाला, माझी समाजात बदनामी झाली , सदरील प्रकरणाचा पोलीसांनी तपास करून तो निकाली काढला असतांना देखील चित्रा वाघ यांनी माझी बदानामी करण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्सर माझेवर खोटे आरोप करून प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार दिली त्यानुसार पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.