बीड

आष्टी तालुक्याला शिवसेनेसाठी आता नवा चेहरा मिळणार ?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Aug :- आष्टी तालुक्यात शिवसेनेचे गेल्या आठवडाभरापासून शिवसंपर्क अभियान सुरु आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी काल दिवसभर आष्टीत धावत्या भेटी दिल्या.आष्टी तालुक्यातील धामणगांव,कडा, हरिनारायण आष्टा,धानोरा या जिल्हा परिषद गटात मेळावे घेतले. सोलापूरवाडी येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव थोरवे यांचा आशीर्वाद घेत असताना तेथे खांडे यांनी माजी आ. साहेबराव दरेकर यांच्याशी बंद खोलीत तासभर चर्चा झाली.या भेटीमुळे राजकीयदृष्ट्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रारंभ करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत गुरुवार दि.२८ जुलै रोजीआष्टी तालुक्यातील धामणगांव पंचायत समिती गणातील बीडसांगवी व पंचायत समिती,आष्टा गणामधील आष्टा,कडा जि.प. गटातील कानडी, धानोरा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान दौरा आयोजित करण्यात आला होता.

ठाकरे सरकारने लोकहिताच्या व शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली.त्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला कसा घेता येईल याची माहिती दिली.या अभियानास शेतकरी, शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणीची चर्चा करण्यात आली.यावेळी मांडवा येथील ज्ञानेश्वर माऊली मुटकुळे यांनी असंख्य युवकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी जिल्हा समन्वयक जयसिंगमामा चुंगडे,जिल्हा संघटक नितीनभैय्या धांडे,तालुकाप्रमुख कुमार शेळके,उपतालुकाप्रमुख अक्षय साप्ते सुभाष राऊत,अक्षय सापते,महेश धोंडे, राजू डुकरे, आश्रुबा अन्ना,अंकुश सांगळे,जालिंदर नरोडे, रोहिदास गणगे,रफिक शेख,महेश एकशिंगे, दादासाहेब लगड, शिवप्रसाद जाधव,नारायण वनवे,दिपक काळे,सोमनाथ खाडे,दिनकर गरगटे,रोकडे विकास,पांढरे प्रशांत,रावसाहेब मासाळकर,गोरख मासाळकर,मच्छिंद्र काटे,भारत घोडके जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.