बीड

कोरोना महाशयांचा बीडमध्ये धुमाकूळ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 Aug :- किंचितश्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पुन्हा एकदा कोरोना महाशयांचा धुमाकूळ सुरु झाला आहे. सध्या बीडमध्ये विकेंड लॉकडाऊन सुरु आहे आणि सोमवार ते शुक्रवार यादिवशी सायं ४ वाजता सर्व बीड बंद होत आहे. तरीही बीडमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये दरदिवसाला सरासरी दोनशे रुग्ण कोरोना बाधित होत आहेत. यावरून कोरोनाच्या तिसर्या लाटेला सुरुवात झाली की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अशाच पद्धतीने जर बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उंचावत गेला तर पुन्हा एकदा बीडकरांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागणार ही शक्यता नाकारता येणार नाही. आज जाहीर करण्यात आलेल्या 5364 कोरोना अहवालात जिल्ह्यात 200 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

अंबाजोगाई 02,
आष्टी 48,
बीड 52,
धारुर 09,
गेवराई 09,
केज 09,
माजलगाव 08,
परळी 01,
पाटोदा 24,
शिरुर 30,
वडवणी 08 असे रुग्ण आढळून आले आहेत