बीड

प्रशासन हैराण, बीडकरही वैतागले; कोरोना आटोक्यात येईना

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 July :- सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरणीला काही लागेना. कोरोनाच्या वाढत्या अकडेवारीमुळे बीडवासीयांच्या मनात लॉकडाऊनची भीती कायम आहे. त्यामुळे बीडकरांना दैनंदीन कामे करणेही अवघड झाले आहे. एकंदरीत बीडकर कोरोनाला पुर्णतः वैतागले आहेत. प्रशासन कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या कमी होत नाहीए. वाढत्या रुग्णसंख्येसमोर प्रशासनही हैराण झाले आहे.

नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडावर मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सच पालन करणे अत्यावश्यक आहे. होईल तेवढं गर्दीमध्ये जाण्यास टाळणे हितकारक आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 5379 कोरोना अहवालात जिल्ह्यात 180 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांमध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 43, बीड 36, धारुर 13, गेवराई 18, केज 14, माजलगाव 05, परळी 02, पाटोदा 18, शिरुर 22, वडवणी 07 असे रुग्ण आढळून आले आहेत