पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडे रस्त्यावर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 July :- भाजप नेत्या पंकजा मुंडे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्या असून परळीत गुरुवारी (दि. 29) पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. कोकणात महापुरामुळे हाहाकार माजला आहे. सरकारकडून मदत करत असले तरी सर्वस्तरातून मदतीसाठी लोकांनी पुढे आले पाहिजे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक अडचणीत पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मदतीसाठी धावून येते. राज्यात सध्या पुराणे थैमान घातले असून पंकजा मुंडे मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्या म्हणाल्या आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो.
वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा लोकनेते मुंडे साहेबबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती “माझ्या वाढदिवसाला सोहळा नको.” त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. कार्यकर्त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचं आहे.
आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. परिस्थिती खूप कठीण आणि बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. माझ्या जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेकक्षा माझी मदत तिकडे पाठवणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
सोशल मीडियावर ‘पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत’ अशा पोस्ट फिरत आहेत. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, आता हा विषय नाही. सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी-काँग्रेस असं काही नाही. “महाराष्ट्रावर आलेलं संकट मोठं आहे. या संकटासाठी समर्पण महत्त्वाचं आहे”. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.