‘या’ अभिनेत्रीचा राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा आरोप
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
29 July :- बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, 28 जुलै रोजी न्यायालयानं याचा जामीन अर्जही फेटाळून लावला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींकडून त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. राज कुंद्रावर पॉर्न व्हिडीओ शूट करुन हॉटशॉटवर पब्लिश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राच्या या अँपबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. शर्लिन चोप्रानेही राज कुंद्रावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे.
दरम्यान, राज कुंद्राच्या हॉटशॉट अँपसाठी पॉर्न व्हिडीओ तयार करुन त्यावर स्ट्रीम करत असे. पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रानं मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलसमोर आपला जबाब नोंदवला आहे. त्यानं एप्रिल 2021 मध्ये राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. शर्लिन चोप्रा विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर राज कुंद्रा यांच्यावर आयपीसी कलम 384,415, 504, 506, 354(ए)(बी)(डी) आणि 509 आणि आयटी अँक्ट 2008 च्या 67, 67(ए) कलमांतर्गत इंडिसेंट रिप्रिजेंटेशन ऑफ वुमेन अँक्ट अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.
शर्लिन चोप्रानं आपल्या तक्रारीत खुलासा केला होता की, 2019 च्या सुरुवातीला राज कुंद्रानं तिच्या बिझनेस मॅनेजरला एका ऑफरसंदर्भात बोलण्यासाठी बोलावलं होतं. 27 मार्च, 2019 रोजी बिजनेस मिटिंगनंतर शर्लिनने दावा केला होता की, एक मेसेज लिहून वाद झाल्यानंतर काहीही न सांगता राज कुंद्रा तिच्या घरी पोहोचला होता. शर्लिन चोप्रानं आरोप केला होता की, राज कुंद्रानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला विरोध करत होती, तरीही कुंद्रा तिचं ऐकत नव्हता.
शर्लिननं हा देखील दावा केला होता की, तिला लग्न झालेल्या व्यक्तीशी कोणतंही नातं जोडायचं नव्हतं. तसेच त्याच्या बिझनेसमध्येही सहभागी व्हायचं नव्हतं. त्यावर राज कुंद्रानं तिला सांगितलं होतं की, पत्नी शिल्पा शेट्टीसोबत त्याचं नातं फार कॉम्पलिकेटेड होतं आणि घरात बराच काळ तणाव असायचा. शर्लिन चोप्रानं सविस्तर बोलताना सांगितलं की, तिनं राज कुंद्राला थांबण्यासाठी सांगितलं कारण ती फार घाबरली होती. त्यानंतर तिनं त्याला धक्का दिला आणि त्याच्यापासून सुटका करुन घेत ती बाथरुममध्ये पळून गेली. दरम्यान, 19 जुलै रोजी राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या घरी छापेमारी केली होती आणि काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीची चौकशी केली होती.