Newsक्राईम

ऑटो रिक्षाचे भाडे देण्याच्या कारणावरून 22 जणांच्या विरुद्ध विनयभंगासह एट्रासिटी नुसार गुन्हा दाखल

ऑटो रिक्षाचे भाडे देण्याच्या कारणावरून वाघाळा या ठिकाणी 22 जणांच्या विरुद्ध विनयभंगासह एट्रासिटी नुसार गुन्हा दाखल
अंबाजोगाई (प्रतिनिधी)    ऑटो रिक्षाचे भाडे देण्याच्या कारणावरून अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी 22 जणांच्या विरुद्ध विनयभंगासहअनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (एट्रासिटी)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
    अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी गुरुवारी  कालिदास विश्वनाथ हजारे या मातंग समाजाच्या ऑटोरिक्षा चालका सोबत ऑटो रिक्षाचे भाडे देण्या वरून भांडण झाले व या भांडणाचे ररूपांतर पुन्हा याच गावातील काही सवर्ण युवकांनी एकत्रित होऊन कालिदास हजारे यांच्या घरावर चालून येऊन अर्वाच्च भाषेत व जातीवाचक शिवीगाळ करून, घरातील महिलेचा विनयभंग करून घराचा दरवाजा मोडला, व पत्र्यावर दगड मारले या कारणास्तव
कालिदास हजारे याच्या फिर्यादी वरून शंकर प्रसाद भगत, कृष्णा बाबुराव भगत, तुकाराम मंचक भगत, रवी साखरे, कृष्णा ढवारे, अजित भगत, सत्यजित भगत, नरसिंग भगत, मयूर भगत, गोपाळ भगत, आदित्य जाधव, अंगद भगत, अशोक जाधव, ईश्वर गायके, नामदेव शेवाळे, पांडुरंग शेवाळे, सुशील भगत, राजाभाऊ भगत, मिठु जाधव, महेश साखरे, नवनाथ साखरे, विजय भगत आदी 22 जणांच्या विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गु र न 216/2020 कलम 143,148, 149, 452, 354, 323, 427, 336, 504 भादवी सह कलम 3(1)(आर), (एस)3(आय) (डब्लू)(आय) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे अधिक तपास करत असुन त्यांना पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे सहकार्य करत असुन आरोपी अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.