बीड

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश; उद्यापासून कडक निर्बंध लागू

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 July :- बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात परत कडक निर्बंध लागु करण्यात येत आहेत. आष्टी, पाटोदा, शिरुर, गेवराई या चार तालुक्यात कडक निर्बंध लागु करण्याचा आदेश आज जिल्हाधिकारी यांनी काढला. यापुर्वीच यातील काही तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियम कडक करु लागले आहे. आज काढण्यात आलेले आदेशात आष्टी, पाटोदा, शिरुर व गेवराई या चार तालुक्यात सकाळी ७ ते दुपारी १२:३० पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे. यानंतर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. यासह शनिवार व रविवार हे दोन दिवस सर्व आस्थापना बंद ठेवण्याचेही आदेश आहेत. जे नियमांचे पालन करणार नाही त्याच्यावर कारवाया करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. विना मास्क फिरणार्यांवर होणार कारवाई. जिल्ह्यात परत रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे सर्वांनीच नियमांचे पालन करण्याची गरज आहे.