बीड

बीड जिल्ह्यात खळबळ! तरुणीचा मृतदेह आढळला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 July :- सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने घटनेने चर्चित असलेल्या बीड तालुक्यातील मांजरसुंबा घाटात आज सायंकाळी ४-४० वाजताच्या सुमारास एका तरुणीचा ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीसानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

मयत तरुणी ही बीड शहरातील नामांकित असलेल्या दिप हाॅस्पीटल येथे नर्स या पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सोनाली अंकुश जाधव वय २६ वर्षे रा. शिवाजीनगर बीड या तरुण नर्सचा मांजरसुंबा घाटात लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तर काही अंतरावर एक दुचाकी स्कुटी एमएच २० ई.बी.२५०४ आढळून आली आहे.

घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस व बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी झाले आहे. व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालय बीड येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान ही घटना आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करीत आहेत.