बीड

बीड- दुकाने केवळ दु. 12:30 पर्यंतच सुरू ठेवता येणार


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 July :- राज्यात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शिरूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण दाखवित जिल्हा प्रशासनाने आता शिरूर तालुक्यातही कडक निबंध लागू केले आहेत. यापुढे शिरूर तालुक्यात सर्व दुकाने केवळ दुपारी १२:३० पर्यंतच सुरू ठेवता येतील. तर दुपारी १ नंतर नागरीकांना रस्त्यावर फिरण्याला बंदी घालण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी हे आदेश काढले आहेत.

यापूर्वीच बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा आणि गेवराई या तीन तालुक्यात असेच आदेश लागू आहेत. बीड जिल्हा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असला तरी जिल्ह्यातील तीन तालुक्यात यापूर्वीच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. जिल्ह्यात सर्व प्रकारचे व्यवसाय दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू असले तरी आष्टी, पाटोदा आणि गेवराईत दुपारी १२:३० पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यात येतील असे आदेश यापूर्वी काढण्यात आले होते. आता यात शिरूर तालुक्याचीही भर पडली आहे. शिरूर शहर आणि तालुक्यात यापूढे दुपारी १२:३० नंतर कोणतेच व्यवसाय सुरू ठेवता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी म्हटले आहे.