सीईटी परीक्षेची तारीख जाहीर; या तारखेला होणार सीईटी परीक्षा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 July :- दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला, आता 11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. 20 जुलै सकाळी 11:30 पासून ते 26 जुलै पर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाईन भरायचे आहे. 10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परिक्षेची आता वाट पाहत होते.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून 100 गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र , इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे.