बीड जिल्ह्यात कडक निर्बंध; दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत मोठा बदल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 July :- सर्वत्र कोरोना विषाणूचे संक्रमण आटोक्यात येत असताना बीड जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणाने वेग धरला आहे. आष्टी,पाटोदा आणि गेवराई या तीन तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक होत चालली आहे. अशावेळी नागरिकांना वारंवार आव्हान करूनही काय उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने या तीन तालुक्यात अधिक कडक निर्बंध लागू केले आहे .
सकाळी सात ते साडेबारा या वेळेत या तीन तालुक्यातील दुकाने सुरू राहतील, त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत येणार नाहीत.या काळानंतर जर कोणाला प्रवास करावयाचा असल्यास किंवा बाहेर पडायचे असल्यास परवानगीशिवाय बाहेर पडता येणार नाही .या नवीन निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर जारवाई केली जाईल असा इशारा प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिला आहे.