बीड

करीनाच्या घरासमोर आंदोलन करू; बीडमध्ये पेटला वाद!


ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

https://www.facebook.com/KskHospitalbeed/

16 July :- बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरच्या ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकावरून बीडमध्ये वाद पेटला आहे. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अल्फा ओमेगा संघटनेनं कारवाई न झाल्यास करीना कपूरच्या घरासमोर करणार आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे बीडमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे.

करीना कपूरने नुकतेच ‘प्रेग्नसी बायबल’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकावर बायबल या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. बायबल शब्द वापरण्यात आल्यामुळे बीडमधील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने आक्षेप घेतला. त्यामुळे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने बुधवारी शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर आज पुन्हा करीना कपूर हिने पुस्तकाला प्रेग्नेंसी बायबल हे नाव दिल्याने तमाम ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, अल्फा ओमेगा या ख्रिश्चन महासंघाने, बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

पुस्तकांच्या नावामध्ये बायबल हा शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना जाणूनबुजून दुखविल्या आहेत, असा आरोप ख्रिश्चन समाजातील अल्फा ओमेगाया ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, तात्काळ या पुस्तकाचे नाव मागे घेऊन करीना कपूर हिने समाजाची माफी मागावी आणि प्रशासनाने करिना कपूर, सहकारी लेखिका आदिती शहा आणि प्रकाशकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा करीना कपूरचा घरासमोर आंदोलन करू, असा इशारा आशिष शिंदे यांनी दिला आहे.