बीड

शाळेच्या फी माफीसाठी बीडमधील संतप्त पालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 July :- कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांना रोजगार गमवावे लागले तर अनेकांची वेतनकपात झाली आहे. हे लक्षात घेऊन शाळांनी फीसाठी पालकांकडे तगादा लावू नये नये, असे सरकारने जाहीर केले. मात्र, बीड शहरातील सेंट अँन्स स्कूल पालकांकडे तगादा लावत असून नवं शैक्षणिक वर्षाच्या पुस्तकांसाठी अडवणूक करत आहे.

अनेक पालकांनी एकत्रित येऊन शाळां व्यवस्थापनाला निदान ५० टक्के तरी फी माफ करा अशा खूपदा विनवण्या केल्या परंतु शाळां व्यवस्थापनाने कुठलाही निर्णय दिला नसल्याने संतप्त पालकांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. आज दि. १३ जुलै रोजी सर्व पालकांनी अपर जिल्हाधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांना निवेदन दिले. फी माफी संदर्भात लवकरच शाळां व्यस्थापनाशी बोलू असे पर जिल्हाधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांनी पालकांना सांगितले आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते तर काही निवडक पालकांनी कार्यालयत जाऊन निवेदन दिले.