News

डोणगाव शिवारात पारधी समाजातील दोन गटात हाणामारी

बंदुक लावली कानाला,जिवंत काडतुसासह बंदूक जप्त

उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण यांची हि घटनास्थळी भेट

तिघा आरोपीना अटक एक दिवसांची पोलीस कोठडी

शहागड (प्रतिनिधी) :- अबंड तालुक्यातील डोणगाव शिवारात जुन्या भाडंणाच्या कारणावरण दोन पारधी समाजातील दोन गटात हाणामारी झाली यामध्ये एकाने दुसऱ्या गटाच्या माणसावर डोक्याला बंदुक रोखल्याने वाद चिघळला होता.दोघांनी परस्परविरोधी तक्रारीत दोन्ही गटाच्या सहा लोकांविरुद्धात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला असून यामध्ये तिघां आरोपींना अटक हि करण्यात आलेली आहे.
हि घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास डोणगाव शिवारातील फिर्यादी नामे मंदाकीनी ग्यानदेव भोसले यांच्या घरासमोर घडली संशयित आरोपी ज्ञानेश्वर अगंद पवार,गणेश अगंद पवार,आनंद अमृता पवार,सर्व रा.रामगव्हाणवस्ती ता अंबड यांनी संगनमत करुन मंदाकिनी भोसले वय 30 यास जिवे मारण्याच्या उदे्शाने फिर्यादी व साक्षीदारास कुर्‍हाड लोखंडे राँड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत जिवे मारण्याच्या धमक्या देऊन डोक्याला गंभीर दुखापत केली.म्हणून वरील चौघा विरोधात कलम 307,504,506,34 भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे

दुसऱ्या गटातील ज्ञानेश्वर अगंद पवार वय 34 वर्ष रा रामगव्हाणवस्ती ता यांच्या फिर्यादी वरून ग्यानदेव हरिभाऊ भोसले,मंदाकीनी ग्यानदेव भोसले रा.डोणगाव यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन मागील भाडंणाच्या कारणावरून शिवीगाळ करुन धमकी देत बहीन नामे चागुंना शिवप्रसाद चव्हाण हिस चापट बुक्यांनी मारहाण केली व आरोपी यांने त्याच्या ताब्यातील बंदूक फिर्यादीच्या जीवे ठार मारण्याचा उदे्शाने डोक्यावर लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गोंदी पोलिस ठाण्यात कलम 307,323,604,34 भा.द.वीसह भारतीय हत्यार कायद्या 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून भांडणाची माहिती मिळतात नव्याने रुजू झालेले गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड,शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक प्रमोंद बोंडले,गोपीनय शाखेचे जमादार बाबा डमाळे,महेश तोठे,नितीन गराद,अविनाश पगारे,पालवे यांनी घटनास्थळी दाखल होऊन गुन्ह्यात वापरलेले बंदुक जप्त करत, तीघां आरोपीना पकडले असून गुरुवारी या तिघांनाही अंबड न्यायालयात ज्ञानेश्वर अगंद पवार,गणेश अगंद पवार,अमृता पवार या दिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी रवानगी झालेली असून आरोपी ग्यानदेव भोसले व मंदाकिनी भोसले यांना अद्याप अटक केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले सदर घटना स्थळावर पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी शेवगण यांनी भेट दिली आहे
पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद बोंडले हे करीत आहेत.