राजकारणबीड

विनायक मेटेंचे पंकजा मुंडेंच्या पक्षांतरावरून मोठं वक्तव्य

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 July : विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी पंकजा मुंडे यांच्या पक्ष बदलण्याच्या मुद्यावरून वक्तव्य केलं असून भारतीय जनता पार्टी ने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना खूप काही दिल आहे.भाजपने महाराष्ट्रातील चौघांना मंत्रिपद दिले पण औरंगाबादचे माजी महापौर जे गोपीनाथ मुंडे यांचे शिष्य राहिलेले भागवत कराड यांना प्रीतम मुंडेंना डावलून मंत्रिपद दिले.कराड हे वंजारी समाजातून येतात आणि वंजारी समाज पंकजा मुंडे मानतो.तमाम ओबीसी समाजही त्यांना मानतो असे असतानाही त्यांना डावलनायत आले याची खडखड बीड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील कार्यकर्त्याच्या राजीनाम्यात झाले .

प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे द्यावे, ते स्वीकारले तरी जातील अशी प्रतिक्रिया देत आमदार विनायक मेटे यांनी राजीनामा सत्र नाट्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले, याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना पण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे आमदार मेटे म्हणाले.