महाराष्ट्र

संभाजी भिडे पुन्हा एकदा बरळले

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 july :सतत काही ना काही वक्तव्य करून प्रकाशाच्या झोतात असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे करते धरते संभाजी भिडे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली.आंबे खाऊन मुले बाळ होतात असे वक्तव्य करून ते टीकेचे धनी झाले होते .करोना म्हणजे शासनाने उठवलेले थोतांड आहे. करोनामुळे सध्या मंदिरे बंद असून देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आलं आहे. माझं केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर मंदिरांची कुलूपं तोडून आत जाऊयात, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळं पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.करोना म्हणजे थोतांड आहे. हे शासन हा थोतांडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळं मोकळं करू देत. काहीही देशात वाटोळं होणार नाही. करोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढं नुकसान झालंय, त्याच्या एक अब्जांश देखील वाटोळं होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे.त्यांनी कोरोनामुळे मंदिर सध्या बंद आहेत.महाराष्ट्रातील तसेच देशातील देवाच्या भक्तांनी मंदिर कुलूप तोडले पाहिजे मंदिरात प्रवेश करायला पाहिजे.